Monday, 3 May 2021

Bharjari ga pitambar

 भरजरी गं पितांबर दिला फाडून

द्रौपदीसी बंधू शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरीचे कापले गं बाई बांधायाला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शालू नि पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हांसी मी पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण भरजरी गं पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची चिंधी फाडून देईन येवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने देऊन प्रभू राखी माझी लाज चिंधी साठी आला माझ्या दरी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण भरजरी गं पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खूण धन्य तोचि भाऊ धन्य ती बहीण प्रीती ती खरी जी जगी लाभाविण चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीसी बंधू शोभे नारायण
Show less

No comments:

Post a Comment